Background

डॉ. वसंतराव देशपांडे

शाश्वत गायक, शास्त्रीय व नाट्य-संगीत ट्रेंड सेटर. वसंतराव देशपांडे यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर येथे झाला जो महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे.

image

01.जन्म एका संगीत पर्वाचा.....

डॉ.वसंतराव देशपांडे यांचा जन्म 2 मे १९२० रोजी विदर्भतील, आजच्या अकोला जिल्ह्यातील मुतीजापूर या गावी झाला व शिक्षण नागपूर शहरात झाले. आई शिक्षिका व ' भक्तिसंगीत शिक्षिका' असल्याने 'संगीताचा वारसा' तिच्या आईच्या उदरातूनच मिळाला असावा. १९२७ साली, एका नाट्यमय घटनेतून 'ग्वाल्हेर घराण्याचे श्री. शंकरराव सप्रे यांच्या 'श्रीराम संगीत विद्यालय' येथे त्यांना प्रवेश मिळाला आणि 'भारतीया शास्त्रीय संगीताच्या ऐतिहासिक पर्वा' सुरुवात झाली. त्यांची 'गायनकला' जाणून 'भालजी पेंढारकर' यांनी 'कलियामर्दन' या त्यांच्या चित्रपटात 'कृष्णाच्या भूमिकेत पदार्पण' करण्याची संधी दिली..

image

02. दीग्गजांचा सहवास.....

'ग्वाल्हेर घराणे' हा जरी त्यांच्या 'संगीत शिक्षणाचा पाया' असला तरी 'किराणा व भेंडीबाजार' घराण्यांच्या 'वैशीष्ट्यपूर्ण चीजाही' त्यांनी कौशल्याने आत्मसात केल्या होत्या. लाहोरमध्ये रेलवे खात्यात नोकरीस असणाऱ्या त्यांच्या मामांनी 'आपली संगीताची विशेष आवड व भच्याचा गाता गळा' या संयुक्त विचारांनी प्रेरित होवून वसंतरावांना आपल्या सोबत लाहोरला नेले. तेथील दोन वर्षाच्या वास्त्तव्यात लाहोर व आजूबाजूच्या परिसरात 'अफाट भटकंती, उर्दू भाषा शिक्षण व संगीत साधना' यावरच तयांनी आपले लक्ष केंद्रित केले. या दरम्यान उस्त्ताद बडे 'गुलाम अली खाँ व उस्त्ताद बरकत अली खाँ' या बंधूद्व्यींची मैफल त्यांनी कधीही चुकवली नाही, 'ठुमरी व गझल' या गायनकलेचा सुक्ष्मात जाऊन अभ्यास केला. एका जमान्यात 'पतियाळा घराण्याचे गायक' असलेल्या 'असद अली खााँ' नामे एका फकिरच्या गाण्याने वसंतराव मोहित झाले आणि वसंतरावांनी त्यांचा गंडाच बांधला. त्यांचाकडे जवळपास सहा महिने केवळ 'मारवााँ' हा एकच राग शिकले जो आजही वसंतरावांची खासियत म्हणुन ओळखला जातो. १९४२ मध्ये लाहोरहून परतल्हयावर मग त्यांनी अर्थरर्जनासाठी पुण्यात 'मिलिटरी अकौंटस' खातयात नोकरी व संगीतसाधनेसाठी 'पंडडत सुरेशबाबू माने' यांचे शिश्यत्व (१९४२- १९५२) पतकरले. मग त्यांना 'भेंडीबाजार घराण्याच्या उस्त्ताद अमजद अली खान' यांचेही मार्गदर्शन लाभले..

image

03. सुरमयी कट्यार....

१९६७ साली, 'कट्यार काळजात घुसली' या संगीत नाटकाने 'पंडित वसंतराव देशपांडे व अभिजीत संगीत' यांना सामान्य प्रेक्षकांच्या समोर सादर केले. या नाटकातील 'खानसाहेब आफताब हुसेन बरेलीवाले' हे पार रेखाटतांना व त्यांच्या पदांना चाली लावतांना 'नाटककार-पुरुषोततम दारव्हेकर व संगीतकार-पंडित जितेंद्राि अभिषेकी' यांच्या मनात 'पंडित वसंतराव देशपांडे हीच व्यक्ती, त्यांची गायकी व स्टाइल' होती, असे रशसकांचे व तद्न्यांचे मत पडले. या नाटकाचे १००० च्या वर प्रयोग अतिशय कमी कालावधीत झाल्हयाने 'खानसाहेब ही व्यक्तीरेखा' रशसकांच्या मनात इतकी 'भरली, ठसली व सामावली' की त्यांना "पु.ल.देशपांडे यांनी बहाल केलेली 'वसंतखाँ देशपांडे' ही पदवी" यावरूनच 'ख़ुशीख़ुशी व आनंदे' 'स्वीकारली, रुजवली व संबोधली''. यावरूनच 'वसंतरावांच्या गायकीची जादू व रशसकाश्रय' याची प्रचीती येते.